सामाजिक

मातोश्री फाउंडेशन ने केले बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

धामणगाव रेल्वे –

तालुक्यातील तळणी रेल्वे या ठिकाणी पोल क्रमांक ७१७/७ जवळ ५६ ते ६० वर्षाचा अनोळखी पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी मृतदेहाची चौकशी केली असता कोणतेही कागदपत्र अथवा ओळखीचा पुरावा आढळून आला नाही. तीन दिवस वाट पाहिल्यानंतर आज या अनोळखी मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी मातोश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी घेतली. व स्वखर्चाने अनोळखी मृतदेहाचे अंत्यसंस्कार मंगरूळ दस्तगीर येथील स्मशानभूमीत पार पाडले.

       सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मातोश्री फाउंडेशन या संस्थेचा मंगरूळ परिसरात सलग पाचव्यांदा बेवारस मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याच्या हा प्रसंग आहे. कोणत्याही परिसरात बेवारस मृतदेह आढळल्यास त्याची माहिती मातोश्री फाउंडेशनला द्यावी असे आवाहन मातोश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी केले आहे.
    मातोश्री फाउंडेशन ने केलेले सामाजिक कार्य हे कौतुकास्पद असून पोलीस कर्मचाऱ्यांना मातोश्री फाउंडेशनचे उमेश भुजाडणे यांचे बेवारस मृतदेह प्रकरणी सतत सहकार्य होते. मातोश्री फाउंडेशन स्वखर्चाने बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार पार पडतात. या कार्याने एक सामाजिक कार्य मातोश्री फाउंडेशन कडून होत आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवरील बराचसा भार हा या निमित्ताने कमी होत आहे. असे मत पोलीस कर्मचारी संदीप पाटील यांनी व्यक्त केले.
    या अंत्यविधीला मातोश्री फाउंडेशनचे सदस्य मंगरूळ दस्तगीर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!