प्रतिनिधी – शशांक चौधरी
कला व विज्ञान महाविद्यालय कु-हा येथे कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवस मराठी भाषा दिवस संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निशा जोशी यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून मराठी भाषा दिवसाचे महत्त्व सांगतांना- “कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त ‘मराठी राजभाषा दिन’ अर्थात ‘मराठी भाषा दिन’ १ मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.” असे प्रतिपादन केले. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. वैभव निमकर (RSP) हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात- “जागर विचारांचा” या संकल्पनेला घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना – मराठी कविता, संत कवनांचे उदाहरणे देत मराठी भाषेच्या महत्त्वा बरोबर विद्यार्थी जीवनात विचारांची आवश्यकता प्रतिपादन केली. कस हा सोन्याचा लागतो, लोखंडाचा नाही. या आश्वासनानी भाषनाची सांगता केली.
त्यानंतर मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून करण राठोड, विशाल ठाकरे, अअक्षय पोकळे, साक्षी नेरकर, स्वाती देशपांडे, तनुजा वानखेडे या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल ठाकरे यांनी केले. आभार प्रदर्शन अमित शेलोकार यानी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना व वंदेमातरम या गीताने झाली.
Post Views: 64
Add Comment