धामणगाव रेल्वे

महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वे च्या वतीने जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

धामणगाव रेल्वे –

दि. १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वे च्या वतीने जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच मराठी राज भाषा मासिक कार्यक्रम अंतर्गत प्रतिभाताई भाकरे मॅडम कामगार अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी कामगार चळवळीचे जनक नारायणराव मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद वरकड तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राम गुप्ता, अन्सार भैया, प्रमुख मार्गदर्शक वरकड सरांनी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या जीवनकार्यावर महत्व पटवून मराठी राजभाषा व कामगारदिन , महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगितले. या प्रसंगी कामगार नंदकिशोर नांदुरकर, संदीप मोरे, चंदु बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विनोद इंगळे केंद्र संचालक यांनी केले. यावेळी माधुरी गवई, अनिता गजभिये, बागवान पडगण उपस्थित होते. तर सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वे च्या सदस्यांनी मेहनत घेतली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!