लग्राच्या आमिषाने तरुणीसोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेऊन व्हिडीओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना ३ ऑगस्ट २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान घडली आहे.
या प्रकरणी तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मध्य प्रदेशातील आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणी सोबत लग्नाच्या आमिषाने जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाचे तिच्या नकळत दोघांचे व्हिडीओ चित्रीकरण तयार केले. तरुणी त्याच्याशी बोलली नाही, तसेच तिने त्याचा फोन उचलला नाही तर तो तिला मारहाण करून शिवीगाळ करत असे.
दरम्यान, तरुणीने आरोपी सोबत बोलणे बंद केले होते. माझ्याशी का बोलत नाही. याचाच राग मनात धरून आरोपीने शरीर संबंधाचे व्हिडीओ तरुणीच्या एका नातेवाईक महिलेच्या व्हॉटस्अपवर पाठवून दिला. याप्रकरणी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.
Add Comment