विनायक बहुउद्देशीय संस्था विरुळ रोंघे व पुरोगामी युवा विचार मंचचे आयोजन
धामणगाव रेल्वे
देशात लोकशाही रुजविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आजच्या नेत्यांना विसर पडत चालला आहे. खरी लोकशाहीची किंमत ओळखायची असेल तर एकदा तरी जेलमध्ये जाणे गरजेचे आहे. तेथे गेल्यावरच कळते की लोकशाही म्हणजे काय ? असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख व प्रसिद्ध व्याख्याते प्रा. श्याम मानव यांनी मांडले. विनायक बहुउद्देशीय संस्था विरुळ रोंघे व पुरोगामी युवा विचार मंच धामणगाव तर्फे येथील आरोही रिसॉर्ट रंगमंचावर आयोजित ‘भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’, या विषयावर व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे, पंचायत समितीच्या सभापती बेबी उईके, दत्तापुर (धामणगाव) खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बबनराव मांडवगणे, माजी नगरसेवक चंदू डहाणे व आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्याम मानव म्हणाले की, आजच्या लोकशाहीत जो तो भयभीत झालेला आहे. स्पष्ट बोलायला आणि लिहायला आजचे पत्रकारही धजावत नाहीत. इलेक्ट्रॉनिक मीडिया पूर्णतः एकतर्फी झाल्यासारखा वागत आहे, अशा वातावरणात जेलमधील जीवन मला आठवते. त्यांना तरच लोकशाहीची किंमत कळते. आज देशात सर्वत्र राममय झाल्याचे वातावरण आहे. श्रीराम हे कुण्या एकाचे नसून राम हे आपल्या सर्वांचे आहेत आणि श्रीराम सत्याचे आहेत ते ढोंगी, खोटं बोलणाऱ्यांसोबत काधीही जाणार नाहीत. तेव्हा दृढ निश्चय करा, लवकरच देशाची स्थिती बदलणार आहे. मी बाबासाहेबांना प्रचंड मानतो, कारण त्यांच्यातील स्वाभिमान सोडला नाही, त्यांनी विचार केला असता तर विदेशात नोकरी करून आरामात जीवन जगता आले असते. परंतु देशातील सर्वच समाजाच्या हितासाठी त्यांनी प्रसंगी अपमान सहन केला, मात्र डगमगले नाही आणि देशाला संविधान दिले. सवित्रीबाई यांनीही निंदा, अपमान सहन केला व देशातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. तेव्हा आपल्यामधील सहनशक्ती थोडी वाढवा, काहीतरी नवा बदल होणारच आहे, असे मत त्यांनी आपल्या व्याख्यानात मांडले.
प्राध्यापक श्याम मानव यांच्या व्याख्यनाला जमलेली गर्दी
यावेळी कार्यक्रमाला श्रोत्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे यांनी केले तर संचालन सागर दुर्योधन यांनी केले. तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मूंधड़ा, सुनील भोगे, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष नितीन कनोजीया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मंगेश बोबडे, संचालक दिनेश जगताप, वैभव पावडे, यशवंत बोरकर,अजय तूपसुंदरे, सच्चिदानंद काळे, सुधीर शेळके,सं जय शेंडे, नंदकुमार मानकर, सुनील मुंदडा, आशिष शिंदे, सचिन घारफळकर, मुकुंद माहोरे, निवृत्ती वैद्य, गणेश धवने, अरुण खोडके, संतोष पळसापूरे, सुधाकर उईके,अमोल भेंडे, अक्षय गावंडे, बबलू भेंडे, श्रीकांत रोंघे, समीर पाटील, राहुल ठाकरे, मयूर डुबे नितीन मोहोळक,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Post Views: 356
Add Comment