क्राईम

अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यावर महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्तरित्या कार्यवाही

आरोपीकडून  ९ ब्रास रेतीसह ३० लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त

धामणगाव रेल्वे –

चांदुर रेल्वे येथील तहसीलदार कडून तळेगाव पोलीस स्टेशन ला अवैध रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त होताच त्यांनी मागितलेल्या मदतीवरून दि. २४ मे २०२४ रोजी मध्यरात्री डिव्हिजन पेट्रोलिंग करीत असताना हद्दीतील ग्राम किरजवळा ते सुलतानपूर रोडने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करताना ग्राम सुलतानपूर फाट्यावर टाटा हायवा ट्रकने रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमावर रेड करून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या ०९ ब्रास रेतीसह टाटा हायवा ट्रक जप्त करीत नमूद आरोपीचे ताब्यातून एकूण ३० लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करीत असल्याची माहिती तळेगाव पोलीस प्रशासनाकडून प्राप्त आहे.
सदरची घटना ग्राम सुलतान पूर बस स्टॅन्ड जवळ घडली असून यामधील आरोपी ट्रक चालक विनोद प्रल्हाद खंडाते, वय ३४ वर्ष, रा. चांदूरवाडी ता. चांदूर रेल्वे, याला अटक करण्यात आली असून सागर गाढवे, ( ट्रकमालक) रा. चांदूर रेल्वे, आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी आतिश कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे तळेगांव येथील ठाणेदार रामेश्वर धोंडगे, एनपीसी सचिन पवार, पीसी संदेश चव्हाण, चालक एचसी पंकज शेंडे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!