देश

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना अखेर जामीन मंजूर ; लैंगिक अत्त्याचार प्रकरणात करण्यात आली होती अटक

जनसूर्या मिडिया 

लैगिक अत्याचार प्रकरणात जेडीएसचे आमदार आणि कर्नाटकचे माजी मंत्री एचडी रेवन्ना यांना न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. ४२ व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वी ६६ वर्षीय राजकारण्याला अंतरिम दिलासा दिला होता.
न्यायाधीश प्रीत जे यांनी एसआयटीचे आक्षेप ऐकण्यास नकार देत जामीन देण्याचे आदेश दिले.
२८ एप्रिल रोजी होलेनारसीपुरा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या या गुन्ह्यात रेवन्ना आणि त्यांचा मुलगा हसन खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी ४७ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपांचा समावेश आहे.
प्रज्वल रेवन्ना २७ एप्रिलला जर्मनीला रवाना झाल्याची माहिती आहे आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. फरार असलेल्या प्रज्वलच्या विरोधात इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. एचडी रेवण्णाला ४ मे ला अटक करण्यात आली होती आणि त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्या न्यायालयीन कोठडीच्या शेवटी, त्याने खासदार आणि आमदारांसाठी विशेष न्यायालयातून सशर्त जामीन मिळवला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!