धामणगाव रेल्वे –
आज दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास शहरातील गांधी चौक परिसरातील रेल्वे फाटकाजवळ १९ वर्षीय युवकाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना उघळकीस आली. युवराज प्रकाश उईके रा. कावली असे मृतक युवकाचे नाव आहे.
युवराज हा धामणगाव रेल्वे येथील आय टी आय कॉलेज ला प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असून तो कधी घरी तर कधी मित्राच्या रुमवर राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्या मागे आई व अविवाहित बहीण आहे. तर २ वर्षाअगोदरच त्याच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते तर घरातील एकुलता एक मुलगा असा निघून घेल्याने उईके परिवारावर दुःखाचा डोगर कोसळला असून संपूर्ण कावली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Post Views: 87
Add Comment