धामणगाव रेल्वे राजकीय

जनतेचे प्रेम आणि विश्वास लाख मोलाची शिदोरी – डॉ. निलेश विश्वकर्मा

नागरिकांचा मिळतोय उदंड प्रतिसाद

धामणगाव रेल्वे – प्रतीनिधी

लोकांचे माझ्यावरील प्रेम आणि त्यांचा विश्वास हि माझ्या साठी लाख मोलाची शोदोरी आहे. मी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही परमेश्वराने माझ्या मागे हि जि भक्कम साथ उभी केली हि निरंतर राहील, असे अभीवचन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी धामणगाव रेल्वे तालुक्यातील गावात प्रचार रॅली दरम्यान केले.
            धामणगाव रेल्वे मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे यांच्या प्रचारार्थ झाडा, आष्टा, चिंचोली, झाडगाव, गिरोली, बोरगाव धांडे, भातकुली, भोखड, उसळगव्हाण येथील प्रचार रॅलीत हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून, डॉ. निलेश विश्वकर्मा यांना समर्थन दिले. मतदार संघातील प्रत्येक गावात उत्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने डॉ. निलेश विश्वकर्मा या वेळी निवडून येथील अशी चर्चा नागरीका मध्ये होत आहे. या वेळी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, अशी हि मतदारान कडून बोल्या जात आहे. त्यांच्या प्रचार यात्रेत होत असलेली गर्दी पाहून विरोधकाची धाबे दनानले आहे. डॉ.निलेश विश्वकर्मा केवळ जिल्हा पुर्ते मर्यादित नसून राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे त्यामुळे त्यांना भक्कम साथ द्या. आणि निवडून आणा. असे आव्हान उपस्थित नागरिकांना गावकऱ्यांनी केल्या आहे.

धामणगाव रेल्वे मतदार संघाचा अध्याप पर्यंत विकास झालेला नाही, कुठलेही मोठे उद्योग नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, महिलावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, गुंडेगिरीने तोंड वर काढले आहे. याला आळा घालण्यासाठी राज्य व केंद्र सरकार सब सेल अपयशी ठरले आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी यावेळी मला विधान सभेवर पाठवायाची गरज मतदार संघातील प्रत्येक गावात डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी मतदारान समोर मांडली आहे त्याला प्रतिसाद म्हणून मतदारांनी हि यावेळी निवडून देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रचार रॅली दरम्यान गावातील महादेव गुहे, रोषण राउत, भीमराव मनटे, मंगेश ठाकरे, भारत उके, सचिन चौधरी, दिलीप डोखने, साहेबराव वाहने ,राहुल मराठे , राजेश माने, राजेश पाटील, यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!