धामणगाव रेल्वे

जनसुर्या बिग ब्रेकिंग न्युज

मंगरूळ दस्तगीर शेत शिवारात बिबट्याचे दोन बछडे आढळल्याने उडाली एकच खळबळ

धामणगाव रेल्वे –

आज दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास बबलू जयस्वाल यांच्या शेतात बिबट्याचे दोन लहान बछडे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बबलू जयस्वाल यांच्या शेतात उसाची लागवड असून ऊस तोडणीचे काम सुरु असताना मजुरांना सकाळी १० च्या सुमारास दोन लहान बछळे दिसून आल्याने चांगलाच गोंधळ उडाला. सदरची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने मोठ्या प्रमाणात बिबट्याचे बछळे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर सुरेश निमकर सह अन्य दोन व्यक्तींनी वनविभागाला सदरच्या घटनेबाबत माहिती दिली असता चांदुर रेल्वे येथील वनविभागाची टीम सह अमरावती येथील रेस्क्यू टीम ने मंगरूळ दस्तगीर शेतशिवारात बबलू जयस्वाल यांच्या शेतात पोहोचून त्या दोन बछडयांना सुरक्षित रित्या रेस्क्यू केले. तसेच पशु वैधकीय अधिकाऱ्यामार्फत त्या बछड्याची तपासणी केली असल्याची माहिती प्राप्त आहे.

रेस्क्यू करताना वनविभागीची टीम 


                  सदरची कार्यवाही आर. बी. पवार वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुरेश मनगटे, किशोर धोत्रे, अमोल गावनेर, वनरक्षक रमेश किरपाने, बचले सह त्यांच्या टीम ने केली. तर दोन्ही बछडे सुरक्षितरीत्या असून वरिष्ठाच्या आदेशाने बिबट मादीला शोधण्याची मोहीम राबविणार असल्याचे किशोर धोत्रे वनपाल चांदुर रेल्वे परिक्षेत्र यांनी सांगितले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!