धामणगाव रेल्वे –
ग्रामपंचायत जळगाव आर्वी समाविष्ट गावातील आरोग्य विषयक अतिक्रमण काढण्याबाबत पंचायत समिती स्तरावरून अनेक पत्रव्यवहार केले असताना सुद्धा जळगाव आर्वी येथील सचिव जी. एन. काळमेघ यांनी अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही न केल्यामुळे आज दि. १ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी मार्फत ७ दिवसाच्या आत सदर गावातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करून तसा अहवाल कार्यलयास सादर करण्याची अंतिम संधी दिली आहे.
ग्रामसेवक जी. एन. काळमेघ सचिव पदाच्या कर्तव्यात हेतुपुरस्पर कसूर करीत असल्याची गटविकास अधिकारी याना पक्की खात्री
अनेक महिन्यापासून जळगाव आर्वी समाविष्ट गाव गंगाजळी गावातील आरोग्य विषयक अतिक्रमण काढण्यासाठी पंचायत समिती यांनी लेखी कळविले होते. परंतु तेथील सरपंच सत्यभामा पंडित कांबळे तथा ग्रामसेवक जी. एन. काळमेघ यांनी सदरच्या विषयाला केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे हा विषय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेल्याने जिल्हा परिषद कार्यालयातून गटविकास अधिकारी याना सदरचे अतिक्रमण काढून तसा अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्याही पत्राला ग्रामसेवक जी. एन काळमेघ यांनी मनावर घेतले नसून आरोग्य विषयक अतिक्रमन काढले नाही. त्यामुळे सातत्याने जिल्हास्तरावरून अहवाल मागविण्यात येत असून जर सात दिवसात अतिक्रमण काढून तसा अहवाल सादर करण्यात आला नाही तर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल अशी तंबी गटविकास अधिकारीमार्फत जळगाव आर्वी येथील ग्रामसेवक जी, एन. काळमेघ याना देण्यात आली आहे.. तर सदरच्या पत्रात आपण सचिव पदाच्या कर्तव्यात हेतूपरस्पर कसूर करत असल्याची खात्री झाल्याचे सुद्धा गटविकास अधिकारी यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आता तरी ग्रामसेवक आरोग्य विषयक अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करणार कि, स्वतः प्रशासकीय कार्यवाहीला सामोरे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या संदर्भात अनेक महिण्यापासून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही का केली नाही? आपल्यावर कुणाचा दबाव आहे का ? अशी विचारणा ग्रामसेवक काळमेघ याना केली असता माझ्यावर कुणाचा दबाव नाही आणि अतिक्रमण काढण्याची जबाबदारी माझी एकट्याची नसून, सरपंच उपसरपंच यांची सुद्धा आहे असे त्यांनी सांगितले. तर याविषयी सरपंच यांचे मत घेण्यासाठी प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
Post Views: 397
Add Comment