वरूड प्रतिनिधी – निलेश निंबाळकर
अमरावती / वरूड : जागृत उन्हाळी क्रीडा व छंद शिबिर २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप डॉ.धीरज टेकोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी मंचकावर जागृत नवयुवक शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शशिकांतजी बेलसरे सर, वानखडे सर, देशमुख सर, क्षीरसागर सर, स्व. माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय, वरूड चे मुख्याध्यापक प्रा. विजय आडे सर, उपप्राचार्या चौधरी मॅडम, उपमुख्याध्यापक भोंडेकर सर, पर्यवेक्षक गजबे सर, डॉ. शरद देशमुख जागृत प्राथमिक शाळा वरूड चे मुख्याध्यापक अमोल इंगोले सर, युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेशभाऊ अग्रवाल, स्व. रामस्वरूपजी शेटीये बहुउद्देशिय संस्था, वरूड चे अध्यक्ष जितेंद्र शेटीये, तसेच यशवंत चित्रपटाचे मुख्य अभिनेता नितीन मनोहरे, श्रीकांत टेकोडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर शिबिर दिनांक २३ एप्रिल २०२४ ते ३ मे २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या यशस्वीतेकरिता स्व. माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय, वरूड, डॉ.शरद देशमुख जागृत प्राथमिक शाळा, वरूड चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळ व क्रीडा प्रशिक्षक, सर्व स्वंयसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन सुनिल उईके यांनी केले
Post Views: 64
Add Comment