क्राईम

IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची छेड काढल्या प्रकरणी अमरावतीच्या तिघांना अटक

नागपूर : जनसूर्या मीडिया

हॉटेलमध्ये मैत्रिणीसह जेवण करीत असलेल्या राष्ट्रीय तपास एजन्सीमध्ये (एनआयए) कार्यरत आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग करणाऱ्या तिघांना सदर पोलिसांनी अटक केली. त्यांनी महिलेकडे बघून अश्लील इशारे केल्यानंतर घरापर्यंत पाठलाग केला होता. राजेश कुमार तलरेजा, सूरज कुन्हाडकर आणि मनोज छाबरा (रा. अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.
एका आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची पत्नी तीन मैत्रिणींसह गेल्या २२ एप्रिलला सदरमधील अशोका हॉटेलमध्ये जेवण करायला गेली होती. तिचा पती एनआयएमध्ये कार्यरत आहे. त्या महिलांच्या बाजुच्या टेबलवर आरोपी राजेश कुमार तलरेजा, सूरज कुन्हाडकर आणि मनोज छाबरा हे जेवण करीत होते. या दरम्यान, तिघांनीही त्या महिलांकडे बघून अश्लील इशारे करणे सुरु केले. महिलांनी त्यांच्याकडे बघून दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यापैकी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा तिघांनी कारने पाठलाग केला. तिला रस्त्यात अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिच्या घराजवळ जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
पोलीस अधिकारी पतीने पत्नीसह सदर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तीनही आरोपींना अटक केली. आरोपी राजेश कुमार तलरेजा हा हॉटेल व्यावसायिक आहे. तर मनोज छाबरा हा फायफान्स कंपनीचा संचालक आहे. पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असल्याची माहिती त्यांना नव्हती. राजेश कुमार तलरेजाचे आईवडील आणि भाऊ पाकिस्तानात राहतात. त्याचा भाऊ पाकिस्तानात संत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!