धामणगाव रेल्वे –
येथील तहसील कार्यालय परिसरात दि. १६ जुलै रोजी मोठ्या थाटामाटात गवंडी बांधकाम कामगार शाखेचे उदघाटन पार पडले. यावेळी गवंडी बाधकामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतजी रामटेके यांच्या हस्ते शाखेचे उदघाटन करण्यात आले. गवंडी बांधकाम कामगार धामणगाव शाखेचे तालुका अध्यक्ष मनोज सापेकार, उपाध्यक्ष रीना गजभिये, सचिव गौतमजी गजभिये यांची प्रामुख्याने निवळ करण्यात आली. यावेळी गवंडी बाधकामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतजी रामटेके यांनी उपस्थितांना बांधकाम कामगार संघटनेच्या योजना बाबतीत अमूल्य असे मार्गदर्शन करून संघटना मजबूत करण्यावर भर दिला तसेच खासगी अभिकर्ता पासून सावध राहण्याच्या सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या.
सदर शाखेच्या उदघाटनाप्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोज सापेकार, उपाध्यक्ष रीना गजभिये, सचिव गौतमजी गजभिये सदस्य मारोती बागडे, सुरज ठाकरे, तसेच उपस्थित पाहुणे मंडळी नदुभाऊ ढोले, समीर ढगे, रामेश्वर बोरकर, मोंटी गजभिये, नवीन यादव, धीरज भैसारे, जगदीश मेश्राम, राजू वानखेडे, किरण मेश्राम, प्रल्हाद कोहादे, झाडगाव कडू, ऍड. बोदीले, देवरावजी कापसे, रवी नवरांगे, तसेच अनेक पाहुणे मंडळी उपस्थित होती. तर उपस्थितांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Post Views: 1,034
Add Comment