कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा येथे कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी – शशांक चौधरी
श्रीराम शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कु-हा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे राष्ट्रीय श्रमसंस्कार शिबिर दिनांक २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या दरम्यान दत्तक ग्राम कौंडण्यपूर ता. तिवसा जि. अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. या ७ दिवसीय शिबिराचे उद्घाटन दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरेश मुंदडा संचालक, श्रीराम शिक्षण संस्था धा. रे. यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात भावी जीवनात आवश्यक असलेले श्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच श्रमाची रुजवणूक या संस्कार शिबिराच्या माध्यमातून होत असते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सुनील आखरे प्राचार्य, कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हा हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, या ७ दिवसीय शिबिराच्या दरम्यान संस्कार मूल्यांची रुजवणूक होते तसेच संकटावर मात करता येते. एखाद्याच्या आयुष्यात या सात दिवसा आमुलाग्र सकारात्मक बदल घडवुन आणण्याची क्षमता आहे. याप्रसंगी कला व विज्ञान महाविद्यालय कु-हा येथील प्राचार्य डॉ. सुनील आखरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सदानंद साधु सचिव, विश्वस्त रुख्मिणी संस्थान, कौडण्यपूर, ना. बा. अमाळकर अध्यक्ष – विठ्ठल रुख्मिणी संस्थान, कौडण्यपूर, विठ्ठल राळेकर, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना धामणगाव रेल्वे, सरपंच ग्रामपंचायत कौंडण्यपूर प्रेमदास राठोड, अशोक पवार अध्यक्ष, ग्रामीण पत्रकार संघ तथा विश्वस्त रुख्मिणी संस्थान, कौडण्यपूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेतून कार्यक्रमाधिकारी डॉ. निशा जोशी यांनी सात दिवसीय शिबिरादरम्यान ग्राम स्वच्छता अभियान, योगासन, प्रार्थना, प्रभात फेरी, श्रमदाना अंतर्गत शोषखड्डे, शेततळे त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूल न बौद्धिक सत्र दरम्यान राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती विशद केली
कार्यक्रमाचे संचालन स्वयंसेविका, रासेयो गटप्रमुख निकीता राऊत हिने केले तर आभार प्रदर्शन डॉ. अजय अभ्यंकर कार्यक्रम अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी, तसेच विठ्ठल रुख्मिणी संस्थान कौडण्यपूर चे सर्व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. रासेयो स्वयंसेवक, रासेयो गट प्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला गावकरी, महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना व वंदेमातरम या गीताने झाली.
Post Views: 78
Add Comment