धामणगाव रेल्वे –
धामणगांव कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवार अंजनसिंगी येथे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात बांधकाम झालेल्या ‘शिदोरी भवन’ या वास्तुचा बहुप्रतिक्षित लोकार्पण सोहळा दि. १३ फेब्रुवारी २०२४रोजी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे हस्ते विधिवत पार पडला. अध्यक्षस्थानी बाजार समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती कविता श्रीकांत गावंडे यांनी केले. प्रास्ताविका मध्ये त्यांनी केलेल्या विविध कामाची माहिती दिली व यापुढेही शेतक-याभिमुख कामास प्राधान्य देण्यात येईल. असे अभिवचन दिले.
वीरेंद्र जगताप यांनी ‘शिदोरी भवन’ नाम फलकाचे अनावरण केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांचे भाषणात शेतक-याभिमुख कामाचे कौतुक केले असुन धामणगांव कृषि उत्पन्न बाजार समिती ही शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेणारी संस्था असल्याने उत्तरोत्तर संस्थेची प्रगती होत आहे. त्याचा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील लोकांना सार्थ अभिमान असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन रवि भुतडा (संचालक) यांनी केले. यावेळी मंचावर माजी आमदार वीरेंद्र जगताप, सभापती कविता श्रीकांत गावंडे, उपसभापती मंगेश बोबडे, संचालक चंदा रा. निस्ताने, डॉ. प्रमोद रोंघे, मेघा प्र. सबाने, संगिता सं. गाडे, सचिन सोमोसे, संदीप दावेदार, दिनेश जगताप,देवराव बमनोटे, मुकुंद माहोरे, विलास भिल, प्रशांत हुडे, गिरीष भुतडा, राधेश्याम चांडक, सुनील ठाकरे, काँग्रेस कमेटी अध्यक्ष पंकज वानखडे, जिल्हा परिषद माजी सभापती सुरेश निमकर, पंचायत समिती माजी सभापती महादेवराव सोमोसे, पंचायत समिती माजी उपसभापती नितीन दगडकर अंजनसिंगी सरपंचा रुपाली गायकवाड, उपसरपंच अवधुत दिवे, . मारोतराव काळे, राहुल ठाकरे, श्री अविनाश इंगळे, सुनिल भोगे, संकेत उभाड, मनोज वेरुळकर आर्दीसह असंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
आभारप्रदर्शन बाजार समितीचे सचिव प्रविण वानखडे यांनी केले.
Post Views: 225
Add Comment