देशी दारूच्या २५ पेट्यासह १० लक्ष २५ हजाराचा मुद्देमाल जप्त
धामणगाव रेल्वे –
सध्या निवडणुकीची धामधूम अतिशय जोरात सुरु असताना मतदारांना प्रलोभने देण्यासाठी राजकीय पुढाऱ्यामार्फत विविध फंडे वापरले जात आहे तर तेवढ्याच ताकदीने निवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने व्हाव्या म्हणून प्रशासन सजगता बागडत आहे. अशातच धामणगाव रेल्वे तालुक्यातील सातेफळ ते घुईखेड कडे जाणाऱ्या रोडवर एका इसमाकडून २५ पेट्या देशी दारूची वाहतूक करताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून अटकेतील आरोपीकडून १० लक्ष २५ हजाराचा मुद्देमाल तळेगाव द पोलिसांनी जप्त केला आहे.
ऋषभ आनंदराव निरवानकर वय २४ वर्ष, रा.अमला विश्वेश्वर ता.चांदूर रेल्वे जि.अमरावती असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तळेगाव पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीद्वारे दि. २३ एप्रिल २०२४ रोजी आरोपी महिंद्रा SUV ५०० कार मध्ये अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार रामेश्वर धोंडगे सह त्यांच्या टीम ने सातेफळ ते घुईखेड जाणाऱ्या रोडवर समृद्धी महामार्गाचे पुलाखाली सापळा रचून अतिशय शिताफीने सदर कार ताब्यात घेतली असता आरोपीचे ताब्यातुन देशी दारू गोल्डन संत्रा ९० मिली.चे १५०० नग (१५ पेट्या) किं ७५ हजार, देशी दारू सिमला संत्रा चे १००० नग (१० पेट्या) किं ५० हजार, महिंद्रा suv ५०० कंपनीची कार एम एच ४८ ए के ५००५ अं.किं. ९ लक्ष रुपये असा एकूण १० लक्ष २५ हजाराचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.
Add Comment