हिंगणघाट – जनसूर्या मीडिया
नजिकच्या मौजा कवडघाट शिवारातील हिंगणघाट वर्धा मार्गावर पोलिसांनी नाकेबंदी करीत दोन ट्रकची तपासणी करीत रेतीची अवैध वाहतूक करणार्यांना ताब्यात घेतले. ट्रकमध्ये १८ ब्रास रेती मिळाली असून ती रेती मौजा दारोडा शिवारातील वणा नदीतून विना रॉयल्टी आणल्याची कबुली दोन्ही ट्रक चालकांनी दिली. त्या आधारे पोलिसांनी कारवाई करीत दोन्ही ट्रक, रेतीसह ८१ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाकेबंदी करीत तपासलेल्या दोन्ही ट्रकमध्ये १८ ब्रास काळी रेती ५४ हजार रुपये, एम. एच २७- बी एक्स ९१०३ व एम. एच २७ बी.एक्स ८०२७ क्रमांकाचे ८० लाख रुपये किमतीचे ट्रक तसेच २० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ८१ लाख २८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सचिन शेंडे (३०) व अजय शेंडे (३०) रा. पाहुर पो. फुपगाव जि. अमरावती तसेच दीपक तेलमोरे (३६), अमोल खदरे (२४), दोन्ही रा. कुर्हा जि. अमरावती यांना ताब्यात घेतले. ट्रक बाबत विचारपूस केली असता ट्रक अमोल धर्माळे रा. पोटे टाऊनशिप अमरावती व प्रफुल बारई रा. उत्कर्षनगर अमरावती यांचे असल्याची माहिती दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट येथील प्रभारी ठाणेदार वृष्टी जैन (भा. पो. से.) यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. हवा. प्रवीण देशमुख, सुनील मळनकर, नितीन ताराचंदी, नरेंद्र आरेकर, विजय हारनुर, जफर शेख यांनी केली.
Post Views: 75
Add Comment