धामणगाव रेल्वे

धामणगाव शहरातील रस्त्यावर अतिक्रमण राज ; जो येईल तो म्हणतो रस्ता आमचाच बा….

सामान्य नागरिकांना चालणेही होते कठीण ; प्रशासनाचा वचक नाहीच

धामणगाव रेल्वे

दिवसेंदिवस शहरामध्ये वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याला कारणीभूत रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदार तसेच हातगाडीवरील फळभाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण.. शहरातील विविध चौकात रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. फळ भाजी विक्रेता यांनी सुद्धा रोडवरच आपली दुकाने थाटल्याने अतिक्रमणामध्ये भर पडलेली आहे तर असून राहिलेली कसर रस्ता आपल्याच बापाचा माल असल्याचे समजून बेशिस्त पणे वाहने उभे करणाऱ्यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे रुंद असलेले रस्ते अरुंद झाले असून खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना देखील वाहतूक प्रशासन तसेच नगर परिषद प्रशासनाचा थोडाही वचक या अतिक्रमण धारकांवर राहिलेला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौकातील रस्त्यासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे शालेय विध्यार्थी, सामान्य नागरिक याना रस्त्याने जाताना तारेवरची कसरत करावी लागले. तसेच भर दिवस जड वाहतूक या मुख्य रस्त्याने चालत असून कधीकधी रस्त्यावरून चालणेही कठीण होत असल्याची ओरड सामान्य नागरिकांमधून होत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाच्यावतीने रस्त्यावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीला कारणीभूत अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बुधवार बाजार ठरतोय वाहनधारकांसाठी अत्यंत डोकेदुखी

नगरपरिषद, शास्त्री चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुधवार बाजार भरत असल्याने वाहतूक प्रभावित होत. शिवाय गांधी चौक ते नगरपालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर बुधवारी बाजार भरत असल्याने मुख्य रस्ता अरुंद होत असून यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याशिवाय सोमवार ते शनिवारपर्यंत याच रस्त्यावर अतिक्रमण होत असल्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकणाकडे नगरपालिका प्रशासनासह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच या प्रकारावर लक्ष केंद्रित करून सर्व सामन्याची वाट सोयीस्कर करण्याची मागणी जनसामान्यांकडून होत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!