प्रतिनिधी – शशांक चौधरी
सेंद्रिय शेती काळाची गरज असून शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे या अनुषंगाने गाव रुईखेडा ता. मुक्ताईनगर जिल्हा.जळगाव येथे नवभारत फर्टीलायझर्स लिमिटेड तर्फे कंपनीचे अधिकारी सुधीर चांदोरे यांनी उपस्थितीत गावातील शेतकरी यांना मार्गदर्शन केले. पिकाच्या आवश्यकतेनुसार आपण सर्व घटक पिकांना देणे गरजेचे असून त्या शेतकरी ठराविक खताचा वापर करीत आहेत, त्यामुळे जमिनीची सुपीकता खालावत आहे, त्यासाठी शेणखत व इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा फवारणी करताना सुद्धा अति विषारी किटकनाशक फवारणी करीत आहेत याचा वापर कमी करावा. असे यावेळी कंपनीचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी जैविक औषधांचे प्रात्यक्षिक केले व शेतकऱ्यांना जैविक सेंद्रिय शेती करावी असे मार्गदर्शन केले यावेळी गावातील शेतकरी वासुदेव बढे, नरहरी झोपे, संजय पाटील, शरद बढे, पुरुषोत्तम झोपे, राजेन्द्र बढे व समस्त गावकरी मंडळी यांची यावेळी उपस्थिती होती.
Add Comment