धामणगाव रेल्वे
धामणगावात विविध ठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे मिश्री कोटकर मैदानावर सेफला हायस्कुल, कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, येथील विध्यार्थानी आपल्या कलेने राष्ट्रप्रेम दाखविले. यावेळी विद्यालयीन संस्थेचे अध्यक्ष अँड. रमेशचंद्रजी चांडक यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले असून तसेच संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय क्रेडेट एनसीसी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
मिश्री कोटकर मैदानात उपस्थित विध्यार्थी वर्ग
धामणगाव रेल्वे येथील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने आपआपली प्रात्यक्षिक दाखविण्यात आले लहान मुलांचे डान्स व वेशभूषा पाहुन धामणगाव वाशी यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच मंचावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष एड. रमेशचंद्रजी चांडक, सचिव अशीष राठी, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत शेंडे सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित असून मोठ्या संख्येने नागरिकांनी कार्यक्रम पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
तहसील कार्यालयात राष्ट्रद्वाजाला सलामी देताना पोलीस अधिकारी
Add Comment