जनसूर्या मीडिया
अंगाची लाहीलाही करणारे तापमान सध्या आहे. भंडारा जिल्ह्यात देखील उष्णतेची लाट पसरली असून वाढत्या तापमानामुळे अनेकांना याचा त्रास झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात उष्मघाताचा त्रास होऊन जिल्ह्यात यंदा पहिला मृत्यू झाला आहे. तर आणखी पाचजण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील भास्कर तरारे (वय ५१) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. उन्हामुळे त्रास जाणवू लागल्याने भास्कर तरारे यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारादरम्यान भास्कर यांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्याचे तापमान वाढत आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून जिल्ह्यात आज ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
वाढत्या तापमानामुळेशहरातील रस्ते निर्मनुष्य झाले असुन नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जातो. अश्या परिस्थितीत उन्हाचा त्रास होऊन लोक आजारी पडून लागले आहेत. अश्यातच या उस्माघाताचा पहिला बळी भंडारा जिल्ह्यात गेला असून आणखी पाच रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपचार घेण्यासाठी दाखल आहेत.
Post Views: 70
Add Comment