अमीर मुलाणी व त्यांच्या टीमने येडशी घाटामध्ये वाचवले तीन मुलांचे जीव
धाराशिव : जनसूर्या मीडिया
नात्याला काळीमा फासणारी घटना जन्म दिलेल्या बापानेच स्वतःच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला येडशी येथे रामलिंग घाट या घाटामध्ये छोट्या छोट्या तीन मुलांना स्वतःच्या बापानेच दुसऱ्याच्या घरी का जाता म्हणून तीन मुलांना पाण्यात बुडवून जिवे मारताना आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी व डॉ.अक्षय खुणे, संदेश लोखंडे, सौरभ भोसले, प्रमोद हेगडे, सुरज धावारे, करण राठोड यांनी पाहिले हा सर्व प्रकार पाहताच येडशी मधील रामलिंग घाटात तात्काळ गाडी उभा करून मुलांकडे धाव घेतली व त्या तीन मुलांचा जीव वाचवला.
आयुष भारत डॉक्टर असोसिएशनची टीम एका हॉस्पिटलच्या उद्घाटना संदर्भात तेरे कडे जात असताना हा प्रकार घाटामध्ये दिसून आला त्या गटामध्ये कोणीही थांबण्यास तयार नव्हते अशा घाटामध्ये आयुष भारत आरोग्य विभागाची पूर्ण टीम थांबून त्या मुलांचे प्राण वाचवले त्यावेळेस त्या मुलांचे वडील पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांना आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी पकडून ठेवले व घटनास्थळी पोलीस मदत मागितली एक तास होऊन गेला पण पोलीस मदत काही मिळाली नाही शेवटी ११२ वरती पोलीस मदत मागितली त्यांनीही फक्त आश्वासन दिले पाच मिनिटांमध्ये आम्ही तुमच्याकडे गाडी पाठवून देत आहे अर्धा तास उलटून गेला तरीही काय मदत मिळाली नाही शेवटी त्या छोट्या निष्पापी बाळांना घेऊन आयुष भारतची टीम येडशी पोलीस ठाण्यामध्ये घेऊन पोहोचली व तेथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यामध्ये त्या निष्पापी बाळांना व त्यांच्या वडिलांना ताब्यात दिले.
Post Views: 3
Add Comment