भारत देशाचा “दानवीर” प्रख्यातउद्योगपती रतन टाटा काळाच्या पडदाआड
‘अजातशत्रु’ फार कमी लोकांना लागु होणारी संकल्पना, कदाचीत बोटांवर मोजण्याइतके माणसं. अशा अजातशत्रु माणसांमध्ये ‘व्हिजनरी’ किती असतील?. रतन टाटा हे सर्व भारतीयांच्या दृष्टीने एक असामान्य व्यक्तिमत्व. असामान्य असुनही ‘सामान्य’ राहणीमानात आयुष्य जगणं आणि त्या सामान्यत्वालाही फार फार विशेष बनवतं.
एक असामान्य उद्योगपती, ज्यांनी केवळ भारतीय उद्योग विश्वाची नवी परिभाषा दिली नाही, तर जगभरात भारतीय उद्योजकतेचा सन्मान वाढवला. त्यांच्या सुवर्णमयी प्रवासात त्यांनी नेहमीच मानवतेला केंद्रस्थानी ठेवले, समाजासाठी काम केले आणि नाविन्यपुर्ण दृष्टीकोनातुन उद्योगाचा विस्तार केला. त्यांनी संकटातुन सावरत, नेहमीच आत्मविश्वास आणि धैर्याचा दीप प्रज्वलित ठेवला. त्यांचे योगदान नव्या पिढ्यांसाठी एक प्रेरणा असुन, त्यांची शिकवण आपल्याला नेहमीच नवी दिशा दाखवेल. रतन टाटा यांच्या कार्याचा वारसा आपल्याला शिकवतो की कधीही हार मानु नका, समाजासाठी आणि देशासाठी नेहमी कार्यरत रहा. रतन टाटा यांच्या जाण्याने एक युग संपल, पण त्यांच्या विचारांची सावली समाजावर कायम राहील. त्यांचा साधेपणा, नेतृत्व आणि दुरदृष्टी आपल्यासाठी नेहमीच प्रेरणा स्त्रोत राहील.
एक भारतीय उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा ह्यांना जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी एका पारशी झोरोस्ट्रियन कुटुंबात झाला. ते 1990 ते 2012 पर्यंत टाटा समुह आणि टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणुन आणि नंतर ऑक्टोंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणुन काम केले. 2008 मध्ये त्यांना पद्यविभुषण, भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. रतन ह्यांना यापुर्वी 2000 मध्ये पद्यभुषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला होता.
वय – संबंधित आजारामुळे 9 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे निधन झाले.
रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र होते, ज्यांना रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. रतनजी टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पुत्र होते. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधुन आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी मिळवली. कॉर्नेलमध्ये असतांना, टाटा अल्फा सिग्मा फ्री फ्रेटरनिटीचे सदस्य बनले. 2008 मध्ये, टाटाने कॉर्नेलला डॉलर 50 दशलक्ष भेट दिली, जे विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय देणगीदार बनले.
त्यांनी टेलको (नंतर टाटा मोटर्स) ची कार निर्मीती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसची माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली. तसेच, टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यासारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी केले. ते भारताच्या एड्स उपक्रमाचे सक्रिय सदस्य होते. ते मित्सुबिशी कॉर्पोरेशन आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळ, जेपी मॉर्गन चेस, बुझ ऍलन हॅमिल्टन आणि अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुपचे सदस्य होते.
भारतीय समाजमनाला आणि उद्योग जगताला मोहुन टाकणारे रतन टाटा यांनी आयुष्यात मानसं आणि संस्था जोडल्या, त्या त्यांच्या नैतिकतेवर आधारित व्यावसायीक नीतीमुळेच व्यवसाय कौशल्य, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अचुकतेचा आग्रह आणि मुख्य म्हणजे व्यवसायवृध्दीचा ध्यास, या सगळ्या गोष्टीमुळे हाती घेतलेल्या कामाचं सोनं करणं, तेही कुठलेही गैरव्यवहार न करता त्यांना सहज जगलं.त्यातुन ते एक ‘परफेक्शनिस्ट’ हे विशेषण सहजपणे लावता येईल, असे व्यावसायिक बनले. एक बलाढ्य उद्योगपती म्हणुन वारुपाला आले. जे काम करायच ते निर्दोष, उत्कृष्ट आणि परिपुर्ण असायलाच हवं या बाबतीत ते विशेष आग्रही राहिले. आणि त्यातुनच ते घडले. ते फक्त व्यावसायीक वर्तुळातच नव्हे, तर या वर्तुळाबाहेरच्या लोकांसाठीही ठरले एक आदर्श, दानशुर, अनुकरणीय आणि पारदर्शक अशी व्यक्ती. नैतिकतेचा, नैतिकदृष्ट्या अचुक असणाऱ्या नेतृत्वाचा आणि या नैतिकतेचा स्वत:च्या संपुर्ण कारकिर्दीत आणि निवृत्तीनंतरच्या कालखंडात सातत्याने वापर करण्याच्या त्यांच्या आग्रहाचा प्रयत्न रतन यांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यातून भारतीय जनतेला वरचेवर आला आहे.
भारतीय उद्योग विश्वाचा मुकुटमणी असलेले रतन टाटा फक्त उद्योग विश्वासाठीच नव्हे तर सर्व भारतीय समाजासाठी आदर्श होते. ज्यांच्यापुढे सर्वांनीच आदराने नतमस्तक व्हांव अशा काही मोजक्या व्यक्तिमत्तवांपैकी ते एक होते. एक युगाचा अंत झाला. शब्दात वर्णन न करता येणार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं, अख्खा देश तुमचा सदैव ऋणी राहील. तुझ्या स्वर्गाची दारे उघडी ठेव देवा,माणसातला देव माणुस तुझ्याकडे येतोय. निशब्द !
अलविदा …..
एकात्मतेचे दीपस्तंभ रतनजी टाटांना भावपुर्ण श्रध्दांजली.
डॉ. विजय बाबर
सहाय्यक प्राध्यापक(सांख्यिकी),
कम्युनिटी मेडीसीन विभाग,जने.मे.कॉलेज, सावंगी (मेघे), वर्धा
मो. नं. 9423118806
Post Views: 31
Add Comment