सामाजिक कार्यकर्ता बाबा ठाकूर सह शेतकऱ्याची कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
धामणगाव रेल्वे –
शेतकऱ्याचे झालेले पूर्णतः नुकसान न दाखविता परस्पर शेतकऱ्याच्या सह्या करून ते फॉर्म पीकविमा कंपीनीला पाठविण्याचा प्रताप कंपनीच्या प्रतिनिधींनी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून सामाजिक कार्यकर्ता बाबा ठाकूर सह चिंचपूर, तुळजापूर, ब्रह्मणपुर येथील शेतकरी तहसील कार्यलायालायार धडकले असून कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी समस्त शेतकरी बांधवाने केली आहे.
सविस्तर असे कि, कधी नव्हे असा चिंचपूर परिसरात वर्ष – २०२२ ते २३ दरम्यान खोलाड नाल्याला महापूर आला त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. बऱ्याचशा शेतकऱ्याने पीक विमा काढला असल्याने त्यांनी नुकसानीबाबत तक्रारी केल्यामुळे कंपनीने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रतिनिधी पाठविले. मात्र कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्याचे झालेले पूर्णतः नुकसान न दाखविता तसेच परस्पर शेतकऱ्याच्या खोट्या स्वाक्षरी करून फक्त १० टक्के नुकसान झाल्याची माहिती कंपनीकडे सादर केली. सदरची बाब शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत कृषी अधिकारी यांनी सुद्धा १३ फेब्रुवारी रोजी कंपनीला याबाबत ई-मेल पाठवला. मात्र १० दिवस उलटूनही कुठल्याच प्रकारे उत्तर कंपनीमार्फत न आल्याने शेवटी पीकविमा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदार याना आज दि. २२ फेब्रुवारी रोजी दिले असून १ मार्च २०२४ पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात नुकसानीचे जैसे जमा न झाल्यास शेतकऱ्यामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे.
यावेळी चिंचपूर, तुळजापूर, ब्रह्मणपुर येथील शेतकरी बांधवासोबत सामाजिक कार्यकर्ते बाबा ठाकूर उपस्थित होते.
१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या निकाली न निघाल्यास शेतकऱ्यांसोबत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.
बाबा ठाकूर – सामाजिक कार्यकर्ता
Post Views: 124
अभिनंदन साहेब मी सिताबाई कुष्णराव दंदे हे.मु.बोपनेताबाद ता.नादगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती,वय ७५आहे.मला अजुन ही पिक विमा योजना, नुकसान भरपाई, पंतप्रधान किसान सन्मान योजना पैसे मिळाले नाही, पटवारी ग्रामसेवक हाकलून लावतात.मला न्याय मिळाला पाहिजे असे तुम्हाला विनंती करतो 9405975072
कोण आहे तिथला ग्रामसेवक आणि पटवारी जो आपल्याला हाकलून लावतो त्यांचे नंबर असेल तर पाठवा…