पोलिसात गुन्हा दाखल ; तिन्ही आरोपी फरार
जनसूर्या मीडिया
पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी आणि लाज काढणारी घटना समोर आली आहे. एका ७८ वर्षीय वृद्धेवर ३० वर्षांच्या ३ मुलांकडून बलात्कार करण्यात आला आहे. कोला जिल्ह्यातील दाळंबी येथे ही घृणास्पद घटना घडली आहे. याबाबत रात्री उशिरा बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोल्यावरून एसटी बसने गावाकडे परतत असताना दाळंबी येथे राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिला बसमधून उतरली होती. तेथून गावाकडे पायी जात असताना तिथे तीन जण मोटरसायकलनं आले आणि गावात सोडून देतो, असं सांगत तिला रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका लिंबाच्या शेतात घेऊन गेले. यावेळी तिघांपैकी तीस ते पस्तीस वर्षाच्या एका व्यक्तीनं सदर वृद्धेवर अत्याचार केला. एवढच नव्हे तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारू अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली.
या दरम्यान गावातीलच दोन लोक रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले. तेव्हा वृद्ध महिलेने आरडाओरड सुरू केली. आवाज कानावर पडताच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. हे पाहताच अत्याचार करणारे तिघे नराधम घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर त्या दोन्ही व्यक्तींनी सदर वृद्धेला सुखरूपपणे तिला घरी सोडलं. घरी गेल्यानंतर वृद्ध महिलेने आपल्यासोबत घडलेल्या अत्याचाराचा संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी थेट बोरगावमंजू पोलीस ठाणं गाठलं आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
Post Views: 76
Add Comment