जिल्हा प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती च्या नेतृत्वात महावितरण कार्यालय समोर धरणे आंदोलन सुरू आहे. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, या तिन्ही कंपन्यांच्या कंत्राटी कामगाराच्या वेतन वाढ, रोजंदारी कामगार पद्धती द्वारे, शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्यासह एकूण १७ मागण्याची पूर्तता व्हावी. याकरिता आझाद समाज पार्टीची अमरावती जिल्हा वतीने बुधवार दिनांक ६ मार्च २०२४ रोजी जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी सनी चव्हाण अमरावती जिल्हाध्यक्ष आजाद समाज पार्टी समीर हुंदके दर्यापूर तालुकाध्यक्ष, वासुदेव पात्रे चिखलदरा तालुका अध्यक्ष संजय भाऊ गडलिंग शहर संपर्कप्रमुख लक्ष्मण चाफळकर शहर उपाध्यक्ष सुरेश ठाकरे उपस्थित होते..
Post Views: 60
Add Comment