चांदुर रेल्वे प्रतिनिधी – प्रथमेश वानखडे
दिं. ५ मार्च २०२४ रोजी गाव तिथे शाखा घर तेथे सैनिक या अभियाना अंतर्गत थुगाव ता.चांदूर रेल्वे जि. अमरावती येथे समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर च्या शाखेची स्थापना व नामफलकाचे नुकतेच उद्घाटन जिल्हा उपप्रमुख लताताई रमेशराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने भंते धम्मसागर, जिल्हा अमरावती च्या उपप्रमुख लता रमेश पाटील, रामेश्वर मोखळे पोलीस पाटील, हंसराज सोनोने, रमेश पाटील, रामेश्वर गडलिंग प्रामुख्याने उपस्थीत होते.
विविध कार्यक्रमाचे आयोजन
सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आल्यानंतर गावामधुन अभिवादन मार्च काढण्यात आला. भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून रामेश्वर गडलिंग यांनी उपस्थित सर्व सैनिकांना व उपासकांना २२ प्रतिज्ञा दिल्या. त्यानंतर समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर शाखा थुगाव च्या कार्यकारणीची व स्थापनेची घोषणा करण्यात आली. या प्रसंगी समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर बद्दल रामेश्वर गडलिंग यांनी आपले विचार व्यक्त केले. दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे सदस्य हंसराज सोनोने यांनी सर्व सैनिकांना दलाची प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमेश पाटील, रामेश्वर मोखळे, लता रमेश पाटील, स्मिताताई गोले, छाया मोखळे, सविता मोखळे, सारीका गोले, कल्पना मोखळे, निता मोखळे, सारीका मोखळे, लता मोखळे, प्रिति मोखळे, लता मेश्राम, रुष्मिता मोखळे, शितल मोखळे, वंदना मोखळे, उज्वला गोले, वैशाली श्रीरामे, संगीता मोखळे, प्रिया मोखळे , समिता नितनवरे, शालुताई मोखळे, निर्मला मोखळे, बबिता मोखळे, भारती मोखळे, संगीता सि. मोखळे, सोनु मोखळे,वनिता मोखळे,सुशिला मोखळे, वर्षा मोखळे,हंसराज सोनोने, मंदा मधुकर ढवळे, सिंधु ढवळे, विमल बोरकर, वर्षा तंबाखे, कविता तांबोळे, कविता हरणे, सुष्मा जितेंद्र सरदार, कमल खंडारे, अलका मेश्राम, रेखा मुरलिया, जयमाला डोंगरे, अष्टशिला पाटील, सविता दलाल सुलोचना खडसे, आरुषी गडलिंग, आणि टेंभुर्णी, सातरगाव,भानखेडा खुर्द, वाकपुर दादापुर, खरबी, थुगाव येथील सैनिक व उपासक उपासीका आणि समस्त गावकरी मंडळी आणि अमरावती जिल्ह्यातील विविध गावामधुन आलेले बहुसंख्य सैनिक उपस्थित होते.
Post Views: 63
Add Comment