राजकीय

जळगाव आर्वी येथे रिपाई आठवले पक्षाची स्थापना

प्रतिनिधी :- धीरज भैसारे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने राज्यस्तरीय सदस्य अभियान अंतर्गत धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आर्वी येथील पुरपिडीत वस्तीतील नागरिकांनी प्रशांत मुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा संघटक यांच्या नेतृत्वाखाली व धिरज भैसारे युवक आघाडी शहर अध्यक्ष रवि उर्फ दादू मेश्राम तालुका संघटक रिपाई आठवले यांच्या मार्गदर्शनात अनेकांनी पक्ष नोंदणी प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.

                    यामध्ये प्रामुख्याने गोवर्धन बोधिले, अनिल वंजारी, दिनेश बोबडे, वनमाला साखरे, रमेश तुरकाने, शेख इब्राहिम शेख अफजल, राजेंद्र नंदेश्वर, जाबिर पठाण, गणेश बमनेले सह अनेकांनी पक्ष सदस्य नोंदणी केली असून पुढील वाटचाल मा.रामदास आठवले साहेब केन्द्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांचे हात व रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी संकल्प केला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!