धामणगाव रेल्वे
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या आष्टा व चिंचोली येथे ग्रामीण शाखा स्थापन करण्यात आले. ग्रामीण भागातील कार्यकर्ते यांना रिपब्लिकन पक्षाचे महत्व जबाबदारी याबाबत माहिती देण्यात आली असून रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संघटक प्रशांत मुन यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचोली व आष्टाया ग्रामीण भागात रिपाई ( आठवले ) पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी आष्टा शाखा चे अध्यक्षस्थानी ललित पिसे यांची नियुक्त करण्यात आली तर चिंचोली शाखेच्या अध्यक्षस्थानी रविन्द्र तोडस यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा संघटक प्रशांत मुन, रवी मेश्राम, इरफान अली , आकाश मुन ,ललित पिसे, रवींद्र तोडस सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment