प्रत्यक्ष पाहणीत रस्त्याच्या मध्यभागापासून ९ मीटर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न
धामणगाव रेल्वे –
विरूळ रोंघे येथील माजी सरपंच अतुल वाघ यांनी गावालगतच असलेल्या शेताला गावठाण, महसूल, सा. बा. वि. तसेच एका खाजगी शेत मालकाची जागा ताब्यात घेऊन त्यावर पक्के कॉलम, तारांचे कंपाउंड बांधून अतिक्रमण केले होते. त्यासंदर्भात ग्रामपंचायत चे सदस्य मंगेश गुल्हाने यांनी पुढाकार घेत संबंधित प्रशासनाकडे तक्रारी दिल्या होत्या. तर त्यानंतर गावातील नागरिकांनी सुद्धा सदरच्या अतिक्रमण विरोधात प्रशासनाकडे दाद मागितली होती.
तत्पूर्वी सदरच्या जागेवर केलेले अतिक्रमण हे चांदुर रेल्वे उपविभागाकडे येत असल्याने धामणगाव रेल्वे सा.बा. वि. अधिकारी वानखडे यांनी तक्रारदार तसेच सा.बा. उपविभाग चांदुर रेल्वे याना पत्र व्यवहार करून कळविले होते. त्या अनुषंगाने सा.बा. उपविभाग चांदुर रेल्वे येथील अधिकारी यांनी सदरच्या अतिक्रमणाबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता माजी सरपंच अतुल वाघ यांनी विरूळ रोंघे कावली वसाड रस्ता प्रजिमा १७ साखळी क्र. १३/०० ते १४/०० या लांबीमध्ये रस्त्याच्या मध्यभागापासून ९ मीटर अतिक्रमण केले असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने माजी सरपंच अतुल वाघ यांना २० मे २०२४ रोजी सा.बा. उपविभाग चांदुर रेल्वे यांनी १५ दिवसाच्या आत केलेले अतिक्रमण काढण्यास सांगितले असून, अतिक्रमणामुळे अपघात होऊन जीवित हानी झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदारी हि अतिक्रमणधारकांची असल्याचे नोटीस मध्ये नमूद आहे.
माजी सरपंच यांनी केलेल्या अतिक्रमणाविरोधात आता तरोडा ग्राम प. प्रशासन देखील सरसावले..
विरूळ रोंघे ते तरोडा या गावामध्ये २ किमी चे अंतर असून तरोडा येथील शाळेतील मुले हे शिक्षणासाठी विरूळ रोंघे येथे ये जा करतात. परंतु विरूळ रोंघे येथील माजी सरपंच अतुल वाघ यांनी या रोडवर पक्के अतिक्रमण केले असून रोड अरुंद झाल्याने गावात महामंडळाची बस तसेच जड वाहने गावात येणे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणात विध्यार्थ्यांना तसेच गावकऱ्यांना समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तरोडा येथील ग्रामपंचायत प्रशासनाने यांनी पुढाकार घेऊन सदरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात २१ मे रोजी सर्वानुमते ठराव पास करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त आहे.
ग्राम पंचायत, महसूल विभागाची कार्यवाही थंड बस्त्यात – मंगेश गुल्हाने सदस्य, ग्रा. प. विरूळ रोंघे
माजी सरपंच अतुल वाघ यांनी मोठ्या प्रमाणात गावठाण, महसूल विभाग, सा.बा. वि अंतर्गत येत असलेल्या जागेवर पक्के अतिक्रमण केले असताना सदरच्या अतिक्रमणाबाबत संबंधित विभागाला मी स्वतः तक्रारी करून त्याचा पाठपुरावा करीत आहे. यावर सा.बा. उपविभाग चा. रे. यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण धारकाला १५ दिवसात केलेले अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली आहे. मात्र ग्राम पंचायत प्रशासन तसेच महसूल विभागाने सदरच्या विषयावर कोणतेही ठोस पावले अद्यापही उचलले नसल्याचे माझ्या निदर्शनास येत आहे.
Post Views: 91
Add Comment