शैक्षणिक

कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वेच्या वतीने शिशु मंदिर मुलांची शिव मंदिर दत्तापूर येथे शैक्षणिक सहल संपन्न

धामणगाव रेल्वे –

कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वेच्या वतीने शिशु मंदिर लहान मुलांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वे येथील शिशु मंदीर मुलांची शैक्षणिक सहल शिव मंदिर दत्तापुर येथे संपन्न झाली.

सहलीमध्ये लहान मुलांनी शिव मंदिर परिसरातील घसरगुंडी, झुल्यावर खेळताना आनंद लुटला. तसेच मुलांनी एकत्रितरित्या जेवणाची मेजवानी लुटली. संपूर्ण सहल अतिशय आनंदात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

यावेळी कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वेचे संचालक विनोद इंगळे, शिशु शिक्षिका माधुरी गवई, अनिता गाजभिये, प्रतीक्षा प्रजापती, तसेच महिला सदस्य रेणुका कटारे, रुपाली घरडे, महेक खान, पुनम कांडलकर, पायल वानखडे, भारती ठाकरे, सोनिया धर्मेंद्रकुमार जाधव, कडूकार, मार्वे यांनी शैक्षणिक सहलीकरिता अतिशय मेहनत घेतली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!