क्राईम

अभ्यासाच्या ताणामुळे होस्टेलवरून मुलीने काढला पळ ; मदतीच्या बहाण्याने वाट्टेल त्याने केला बलात्कार

घटनाक्रम ऐकून आई-वडिलांसह पोलीसही हादरले

संभाजीनगर: जनसूर्या मीडिया

अभ्यासाचा ताण, त्यात आई वडिलांचा प्रचंड दबाव, नीट परीक्षेचे ओझं या सर्वाला कंटाळून अल्पवयीन मुलगी हॉस्टेल सोडून पळून गेली होती. मात्र या एका चुकीमुळे मोठी किंमत तिला मोजावी लागली आहे.रस्त्यात भेटेल त्याने मदतीच्या नावे तिच्यावर बलात्कार केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
तरुणी नीट परीक्षेची तयारी करत होती. तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि यासाठी अभ्यास सुरू होता. मात्र अभ्यासाचं ओझं इतकं की ते तिला सहन होत नव्हतं. त्यातून घरच्यांचाही दबाव यामुळे ती वैतागली होती. यामुळे सगळं सोडून ती निघून गेली. आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला आणि पुण्यातुन तिला संभाजीनगरमध्ये आणलं. मात्र त्यानंतर या मुलीने जी आपबीती सांगितली त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. तिचे आई वडील तर ढसाढसा रडायला लागले, एक छोटीशी चूक या मुलीला आयुष्याचा धडा शिकवणारी ठरली. या सर्व काळात तब्बल 4 जणांनी या मुलीवर मदतीच्या बहाण्याने अत्याचार केला होता.

अत्याचाराचा घटनाक्रम

– मुलीने हॉस्टेल सोडलं आणि ती परभणीला गेली. तिथे रेल्वे स्थानकावर तिला आरोपी प्रदीप भेटला. राहण्यासाठी जागा देण्याचं आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला.
– त्यानेच तिला पुसद येथे सोडलं. पुसदला ओळखीचा असलेल्या रोहितने पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला
– त्यानंतर ती नाशिकला गेली. तेथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिलसोबत भेट झाली. त्यानेही तिला जेवण, राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अत्याचार केले.
– पीडिता नंतर पुण्याला गेली. तिथे टॅक्सीचालक समाधानसोबत भेट झाली. त्यानेही तिच्यावर अत्याचार केले
या सगळ्या आरोपींवर आता पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील एक आरोपी हा तिचा चुलत भाऊ असल्याचं सुद्धा कळत आहे. त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवा असं आवाहन आता पोलीस करत आहेत.
अभ्यासाचा ताण आणि आई-वडिलांचा रोष यातून या मुलीने घर सोडलं खरं, मात्र नंतर दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकल्याने या मुलीचा घात झाला. आता या मुलीला जबर मानसिक धक्का बसला आहे. तिच्यावर उपचार होतील. मात्र मनावर झालेल्या या जखमा कधीच पुसणाऱ्या नाहीत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!