घराचे बांधकाम करताना ४ मे रोजी घडली होती दुर्दैवी घटना
धामणगाव रेल्वे
शहरातील स्थानिक गोयंका नगर येथे ४ मे रोजी दुपारी ३ : ४५ च्या सुमारास घराचे बांधकाम करीत असताना बांधकाम मिस्त्री दिनेश मेश्राम रा. गोयंका नगर धामणगाव रेल्वे याना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. तर मृतक यांचा मुलगा प्रणित दिनेश मेश्राम यांच्या फिर्यादीवरून अखेर ४ दिवसानंतर आरोपी घरमालक अशोक केदार मांडवकर वय – ४५ रा. गोयंका नगर, धामणगाव रेल्वे यांच्यावर कलम ३०४ नुसार दत्तापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतक दिनेश मेश्राम हे ४ मे रोजी आरोपी यांच्या घराचे छपाईचे काम करीत असताना त्यांच्या घरासमोरून थ्री फेज लाईनच्या जिवंत विद्युत तारा गेल्या असल्याने त्याचा स्पर्श होऊन मृतक बांधकाम मिस्त्री दिनेश मेश्राम यांचा मृत्यू झाला होता. आपल्या घरासमोरून जिवंत विद्युत तारा गेल्या असताना देखील घरमालकाने कोणतीही खबरदारी न घेता मजुरांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षेचे साहित्य न दिल्याने त्या जिवंत तारांना स्पर्श होऊन फिर्यादीच्या वडिलांचा मृत्यू झाला. अशा विषयाचा जबानी रिपोर्ट मृतक दिनेश मेश्राम यांच्या मुलगा प्रणित मेश्राम यांनी दिल्याने घरमालक अशोक केदार मांडवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Views: 87
Add Comment