क्राईम

शुल्लक कारणावरूनअवघ्या ९ महिन्याच्या बाळावर शेजाऱ्याने केले कुऱ्हाडीने वार

 जनसूर्या मीडिया

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. कौटुंबिक भांडणात अनेकदा घरातील लहान मुलं भरडली गेल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आपसातल्या रागामुळे कोण काय करेल याचा काही नेम नसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कचरा टाकण्यावरुन शेजाऱ्याशी झालेल्या वाद चक्क एक नऊ महिन्याच्या बाळाच्या जीवावर बेतला आहे. बेलापूरमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दारासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद इतका विकोपाला गेला की अखेर या भांडणांमध्ये नऊ महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार झाला.या मध्ये बाळाच्या कपाळवार मध्यभागी सरळ वार झाला आहे. बाळ गंभीर जखमी झाले असून प्रचंड रक्तस्त्राव झाला.

बाळावर रुग्णालयात उपचार

सध्या या घटनेमधील आरोपी फरार असून त्याच्याविरोधात सागरी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे. बेलापूर गावाच्या स्मशानभूमीच्या पाठीमागील झोपडपट्टीमध्ये ही घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या नऊ महिन्याच्या बालकावर सध्या उपचार उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. बाळावर वार झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहे

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!