तालुक्यात विविध भागांना भेटी देत स्वीकारले अभिवादन
धामणगाव रेल्वे प्रतिनिधी –
धामणगाव रेल्वे मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी निवडनुक प्रचारासाठी चांगलाच धडाका लावला आहे. रिंगणातील उमेदवाराचे प्रेशर वाढवण्यासाठी आम्ही सिलेंडरलाच मतदान करण्याचा निर्धार महिला, पुरुष व युवकांनी बोलून दाखवला.डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी गावो गावी जाऊन मतदानाचे अभिवादन स्वीकारले. त्यांचा पदयात्रेला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
डॉ. निलेश विश्वकर्मा धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोली, तळणी, निभोरा बोडखा, सोनेगाव, विटळा, देवगाव, आजनगाव, सुलतानपुर, सावळा, आसेगाव, नारगावंडी, देवगाव येथून प्रचाराचा शुभारंभ झाला. धामणगाव रेल्वे मतदार संघाचे परिवर्तन घडवून मतदार संघाचा विकास करून आपण निवडणूक मैदानात असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले दरम्यान आपल्या विकासाचे सर्व समावेशी व्हीजनही त्यांनी मतदारा पुढे सादर केले. डॉ. निलेश विश्वकर्मा यांची आंदोलने, सेवा कार्य, रोजगार व विकास कार्यावर असलेला जनतेचा विश्वासाचे प्रतीबिंब त्यांच्या प्रचार रॅलीत उमटत आहे. त्यांच्या या पदयात्रेमुळे धामणगाव तालुक्यात चैतण्याचे वातावरण परसले आहे. नागरिकांनी हि उत्फूर्त प्रतिसाद देत आमचे मत विकासाला असून डॉ. निलेश विश्वकर्मा यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आश्वासन नागरिक देत आहे.
विकासाच्या ध्येयाशी जोडलेली हि भावनिक साद मतदारांच्या हृदयात नवीन उर्जा आणि आशा निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे रॅली मध्ये देवगाव येथील दिलीप रंगारी, सुभाष रंगारी, शंकर पाटील , रमजान शेख जाकीर, दीरपुर येथील तेजस सवई, अरुण लोखंडे, मदन लोटे, संजय चोरे, गजानन मानकर, रवी गावंडे, सावळा येथील सचिन मून, मंगेश भोगुलकर, मीना ढगरे तर नारगवंडी येथील भुजबळ रंगारी, ज्ञानेश्वर मेश्राम, दिलीप डोखने, साहेबराव वाहने, वैभव कांबळे, दादाराव कांबळे, राजेश माने, रमेश पाटील यांच्या सह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 20
Add Comment