राजकीय

डॉ. निलेश विश्वकर्मा यांना विविध संघटनांचा पाठीबा

तेली, माळी, फासेपारधी, पंजाब खालसा एट संघटनेचा समावेश

चांदुररेल्वे

       विधानसभेची जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तस तसे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांना सोमवारी तेली, माळी, फासेपारधी, पंजाब खालसा एट संघटनेने जाहीर पाठींबा दिला आहे.
          वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा हे गेल्या सहा दिवसांपासून मतदार संघातील तिन्ही तालुके पिंजुन काढत आहे. डॉ. निलेश विश्वकर्मा यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता विरोधी पक्षाचे धाबे दणाणले आहे. जस जशी निवडणूक जवळ येत असून, वातावरण सुध्दा चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. डॉ. निलेश विश्वकर्मा यांना सोमवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगलापूर येथील माळी समाजाच्यावतीने पाठींबा देण्यात आला असून, यामध्ये नामदेव निकोडे, वैभव वर्हेकर, अंगतराव वर्हेकर, श्रीकांत भोयर, रोहीत निकोडे, मुरलीधर निकोडे यांचा समावेश आहे. तर तेली समाजाच्यावतीने धानोरा फरशी येथील राहुल हिगांसपूरे, मोहन हिंगासपूरे, संजय गुल्हाने, तर पंजाब खालसा एट संघटनेकडून कर्तासिंग, जपतसिंग, जगनसिंग, निलेशसिंग, सुमित सिंग, राहुल सिंग यांचा समावेश आहे. तर फारेपारशी समाजाच्यावतीने अभय पवार, सुभाष भोसले, गजानन पवार, रमेश पवार, नकासिंग भोसले, राज पवार, शिवा पवार, नितीन भोसले, राजेंद्र भोसले (सर्व रा. नांदगाव) यांचा समावेश आहे.
              डॉ. निलेश विश्वकर्मा यांना मिळत असलेला विविध संघटनेचा पाठींबा, त्यामुळे त्यांना या निवडणूकीत मोठे बळ मिळत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!