धामणगाव रेल्वे –
देव दगडात नाही तो माणसात आहे त्याची सेवा करा असा संदेश गाडगे महाराजांनी दिला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र अमरावती द्वारा संत गाडगे महाराजांचे प्रचार कार्य व स्वच्छता दिंडी त्या माध्यमातून पथनाट्य समाज जागृती करून संत गाडगे महाराज यांच्या भव्य दिव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डॉक्टर मुकुंदराव के पवार संकुलाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्राविण्य मिळवली गाडगे महाराजांच्या दीडशे ओरिजनल व दुर्मिळ छायाचित्राचे प्रदर्शन घेण्यात आले होते. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते याच संत गाडगे महाराजांच्या विचार व प्रचार कार्यामध्ये संस्थेने मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या वतीने संत गाडगेबाबा अध्यासन केंद्रामध्ये संत गाडगेबाबांची दशसूत्री व सरपंचांचे अधिकार व कर्तव्य या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर मुकुंदराव के पवार संकुलाचे सचिव शिवाजी पवार यांना अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंदजी बाराहाते यांच्या हस्ते सेवा सन्मान स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच सहकारी हनुमंत ठाकरे यांच्याही कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी संत गाडगेबाबा अध्यासन केंद्राची प्रमुख डॉक्टर दिलीप काळे सरपंच संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश गजानन बोंडे उपस्थित होते असेच समाज उपयोगी कार्य आपल्या हातून घडत राहो आपल्या संस्थेने केलेली सहकार्य याबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आपले सहर्ष स्वागत करीत आहे गाडगे महाराजांच्या स्वप्नातील आपले संकुल गाडगे महाराजांच्या दशसूत्री चा अवलंब करून भविष्यात मोठे हो अशा सदिच्छा माननीय कुलगुरू यांनी यावेळी दिल्या.
Post Views: 67
Add Comment