धामणगाव रेल्वे

आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धामणगावात पोलिसांचा रूटमार्च

धामणगाव रेल्वे

१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती व १४ एप्रिल महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिम्मित आगामी सण उत्सवामध्ये शहरात शांतता राहावी, कुठल्याही प्रकारे कायदा व सुववस्था बिघडू नये, याकरिता दत्तापूर पोलीस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ : ३० च्या दरम्यान शहरात पोलिसांचा रूट मार्च निघाला.

रूट मार्च दरम्यान शास्त्री चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक कडे प्रस्थान करतांना पोलीस प्रशासन

  सदर रूटमार्च पोलीस स्टेशन येथून भगतसिंग चौक, गांधी चौक, टिळक चौक, शास्त्री चौक सह छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत निघाला असून दत्तापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक चपाईतकर सह धामणगाव रेल्वे येथील तसेच बाहेरील पोलीस स्टाफ मोठ्या प्रमाणात उपस्थित होता..

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!