सामाजिक

धामणगावात एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर व धम्म प्रबोधन कार्यक्रम संपन्न

भारतीय बौद्ध महासभा धामणगाव रेल्वे च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

धामणगाव रेल्वे –

श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला बळी पडलेल्या व्यक्ती समाजासाठी किती घातक असतो, तसेच धम्म केवळ देशाचीच नाही तर जगाची सेवा करणारा आहे, याचा प्रचार प्रसार करण्यासाठी फाल्गुन पौर्णिमा राहुलाची धम्मदीक्षा च्या पावन पर्वावर दरवर्षी प्रमाणे यावर्षीही द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा तालुका धामणगाव रेल्वेच्या वतीने दि. २५ मार्च २०२४ रोजी एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर व धम्म प्रबोधन शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन दिवंगत सुरेंद्र मेंढे यांच्या शेतामध्ये करण्यात आले होते.

        सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष विजय लोखंडे ( तालुका कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा धामणगाव रेल्वे, ) उद्घाटक म्हणून ज्योती सुरेंद्र मेंढे व प्रमुख मार्गदर्शक अरुण भगत (जिल्हा संघटक वर्धा), रुपेश वानखडे (जिल्हा सरचिटणीस, यवतमाळ), विनय मिरासे ( ज्येष्ठ साहित्यिक व कवी यवतमाळ), प्रमुख उपस्थिती म्हणून राहुल गायकवाड (तालुका अध्यक्ष धामणगाव रेल्वे,) प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार चोरपगार (राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य), विलास मोहाडे (जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अमरावती) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

       सदरच्या कार्यक्रमात मी रमाबाई आंबेडकर बोलतेय चा एकपात्री प्रयोग उन्नती गजानन मेश्राम या मुलीने सादर केला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जयमाला लोखंडे तर आभार प्रदर्शन सौ. अर्चना ढोकणे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामीण भागामधील शाखेच्या पदाधिकारी सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा धामणगाव रेल्वे च्या सर्व सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!