अपघात

धामणगाव ते देवगाव रोडवर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

मृतदेह ओळखीचा असल्यास दत्तापूर पोलिसाकडे संपर्क साधण्याचे आवाहन

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

धामणगाव ते देवगाव रोडवर राम लखन नथुजी यादव यांच्या शेताजवळील डांबर रोडवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना आज दि. १५ ०९ २०२४ रोजी उघडकीस आली. फिर्यादी आसेगाव येथील पोलीस पाटील मोहन विठ्ठल पंधरे याना गावातील अमोल तुकडम यांनी फोन करून माहिती दिली कि, धामणगाव ते देवगाव रोडवर राम लखन नथुजी यादव यांच्या शेताजवळ अंदाजे ३० ते ३५ वर्षाचा अनोळखी इसमाचा मृतदेह पडला आहे. अशा माहितीवरून घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावरून सदर इसमाच्या अंगावर निळ्या हाफ बायांची टीशर्ट हिरवट भुरकट रंगाचा लोर ज्यावर पांढऱ्या व शेंद्री रंगाचा पट्टा असलेला इसम अपघात स्थितीत मृत अवस्थेत पडलेला दिसला. अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक ३९१/ २०२४ कलम २८१ ,१०६, (१) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला..

           सदर इसम पुरुष जातीचा असून अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष त्याच्या अंगात निळ्या रंगाची हाफ बायाची टी-शर्ट, हिरवट भूरकट रंगाचा लोवर ज्यावर पांढऱ्या व शेंदरीरंगाचा पट्टा आहे, वर्ण सावळा उंची ५ फूट ३ इंच अशा वर्णनाच्या इसमा बाबत कुणाला माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन दत्तापूर येथे संपर्क साधावा असे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले.

 

संपर्क
पो.स्टे. दत्तापूर – ०७२२२ / २३७०५४
ठाणेदार गिरीश ताथोड – ९४२३४३३५२३
तपस अधिकारी – दीपक पंधरे – ९८२३८६६४६६

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!