धामणगाव रेल्वे

धामणगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर ; अनेकांच्या घराचे छत उडाले, तर बऱ्याच ठिकाणी विद्युत तारा तुटल्या

अनेक कुटुंबाचा संसार आला उघड्यावर

धामणगाव रेल्वे – 

दि. १२, आज दुपारपासून धामणगाव तालुक्यात अवकानी पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली असून शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या तर अनेकांच्या घराचे छत उडून गेल्यानं बहुतांश कुटुंबाचा संसार हा उघड्यावर आला आहे.

 

वादळी वाऱ्याचा सर्वात जास्त फटका विरूळ रोंघे या गावाला बसला असून जवळपास २५ ते ३० कुटुंबाच्या घरावरील छत हे जमीनदोस्त झाले आहे. तर बऱ्याच ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्यामुळे विरळ रोंघे, तरोडा, गंगाजळी सह गावातील विद्युत पुरवठा बंद पडलेला आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!