Uncategorized

दुरांतो एक्सप्रेस च्या धडकेत रेल्वे कर्मचारी जागीच ठार

यूनिट न.- ०१/ टीएमटी चा रेल्वे कर्मचारी रेल्वे ट्रॅकवर काम करीत असताना आज सकाळी ९: २० सुमारास दुरांतो एक्सप्रेस च्या धडकेत कर्मचारी जागीच ठार झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मंगेश मिलिंद शंभरकर असे मृतक रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. आपले दैनंदिन कामकाज करीत असताना अशाप्रकारे घटना घडल्याने संपूर्ण रेल्वे प्रशासनामध्ये शोककळा पसरली आहे.

मृतक मंगेश मिलिंद शंभरकर, हे ऑगस्ट २०१४ मध्ये आपल्या कर्तव्यावर रुजू झाले असून ट्रॅकमेंटेनर या पदावर कार्यरत होते. आज दि. ०२ मे २०२४ रोजी km ६७०/३५-३७ UP मेन लाईन यावर ग्रीसींग चे काम करीत असताना सकाळी ९;२० च्या सुमारास दुरांतो एक्सप्रेस च्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना घडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!