राजकीय

भाजपकडून पैसे घेत, प्रचार केल्याची कबुली दिल्याने ? वंचितच्या कार्यकर्त्याने बंडखोराला काळं फासत केली बेदम मारहाण

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

जनसूर्या मीडिया – बीड

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. अनेक पक्षामध्ये बंडखोरी करून उमेदवार मैदानात उतरले आहे. पण बीडमध्ये वंचित आघाडीमध्ये बंडखोरी केली म्हणून उमेदवाराच्या तोंडाला काळं फासून बेदम मारहाण करण्यात आली.
बीडच्या केज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघडीचे पुरस्कृत उमेदवार सचिन भिमराव चव्हाण यांना वंचितच्या जिल्हाध्यक्षाने तोंडाला काळे फासून फटके देत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार यांच्याकडून प्रचार यंत्रणा आणि आर्थिक मदत घेतल्याची कबुली देखील दिली होती. तसंच पक्षश्रेष्ठीकडे तसे पत्र पाठवून द्या, मी शिक्षा भोगायला तयार असल्याचा देखील सांगितलं होतं. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाची बदनामी होईल अशा पद्धतीचे वर्तन केलं. यामुळे संतापलेल्या जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी उमेदवार सचिन यांना चौकात काळे फासून मारहाण केली.

सचिन चव्हाण पत्रात काय म्हणाले?

उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे पत्र लिहून पाठिंबा काढून घेण्यासंदर्भात विनंती केली होती. “मी सचिन भीमराव चव्हाण २३२ केज विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अर्ज केला होता. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्याकारणाने आ. रेखाताई ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिनांक २ /११ /२०२४ रोजी मला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळावा किंवा पक्षाने पुरस्कृत करावे यासाठी रीतसर विनंती अर्ज केला होता. त्या अनुषंगाने दिनांक ६ /११ /२०२४ रोजी संघर्ष भूमी अंबाजोगाई या ठिकाणी केज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा, तालुका, शहर, सर्कल, पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक घेऊन त्या बैठकीत ठराव घेऊन मा जिल्हाध्यक्ष यांनी २० पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचा ठराव आपणाकडे पाठवला. त्या बैठकीत मी उपस्थितांना शब्द दिला होता की, पक्षाने मला पुरस्कृत म्हणून मान्यता दिली तर, मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा देईन आणि पक्षाचा जास्तीत जास्त प्रचार करून वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मतं कसे मिळवता येतील याचा प्रयत्न करेल. मी कोणत्याही प्रस्थापितांच्या दारात जाणार नाही. पक्ष बदनाम होईल असे वर्तन करणार नाही. अशा प्रकारचे शपथपत्र ५०० रुपयांच्या बॉण्डवर लिहून दिले आहे. पण पक्षाने उमेदवारी जाहीर करताच मी भाजप नेते नंदकिशोर मुंदडा व डॉ वासुदेव नेहरकर यांची भेट घेऊन प्रचारा यंत्रणेसाठी पैशाची मागणी केली. ही गोष्ट खरी आहे व त्यांनी मला आर्थिक मदतीही केली. मी यंत्रणेसंदर्भात जो शब्द दिला होता तो पाळला नाही. मी पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांचा संपर्क केला नाही. जिल्हाध्यक्ष यांनी वेळोवेळी यंत्राने संदर्भात तगादा लावला असल्याकारणाने आजपर्यंत त्यांना मी टाळत आलो आहे, ही गोष्ट खरी आहे.
तरी मी साहेबांना विनंती की, माझ्याकडून पक्ष विरोधी कारवाई झाली आहे. मी पक्ष बदनाम होईल असेही वर्तन माझ्याकडून झालेले आहे. तरी आपण जी शिक्षा मला द्याल ती मी भोगण्यास तयार आहे.”

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!