अमरावती:
हजरत बाबा ताजोडीन रुग्ण सेवा संस्थेचे अध्यक्ष, मोहम्मद जाकीर अब्दूल मजीद, यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाला पत्राचे निवेदन केले आहे. यामध्ये, अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लिफ्ट व स्ट्रेचर रॅम सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी मागणीत सांगितलं की, रुग्णालयातील लिफ्ट व स्ट्रेचर रॅम ची सुविधा शीघ्रपटे सुरू करण्यात यावी, ज्यामुळे रुग्णांना गैरसोय होणार नाही. तसेच नविन ओपीडी ची जागा असल्यामुळे जेष्ठ नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे, रुग्णांना नाहक त्रास सहन करून लिफ्ट व स्ट्रेचर रॅम ची व्यवस्था शीघ्रपटे करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागण्यांच्या गांभीर्याने विचार करून वरिल व्यवस्थेचे निवारण करावे करीता अर्ज सविनय सादर केले आहे. तसेच माहितीकरिता व उचित कारवाई करिता जिल्हाधिकारी अमरावती यांनाही पत्र दिले. निवेदन देते वेळी सुल्ताना परवीन मोहम्मद ज़ाकिर, अब्दुल वासिक हीरो टेलर, पत्रकार कासिम मिर्ज़ा,अब्दुल हमीद,मोहम्मद मुस्तकीम हजर होते.. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे व जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.
Post Views: 97
Add Comment