राजकीय

काँग्रेस – भाजपने ६० वर्षात फक्त कमिशन केंद्र चालवले

डॉ. निलेश विश्वकर्मा यांचा घनाघाती आरोप

चांदूर रेल्वे प्रतिनिधी –

धामणगाव रेल्वे मतदार संघ गेल्या ६० वर्षा पासून समस्याचे माहेर घर बनले आहे. दोघांनीही आलटून पालटून सता उपभोगून फक्त कमिशन केंद्र चालवले आहे. त्या मुळे विद्यमान आमदार व काँग्रेस चे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना या वेळी जनतेने हिसका दाखवा. त्यांचे अनेक पुरावे माझ्याजवळ असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी केला आहे.
मतदार संघात गेल्या कित्येक वर्षा पासून कामे झाली नाही. ग्रामीण भागात झोपडपट्यामध्ये वाढ झाली, मात्र मुलभूत सुविधा झाल्या नाही बचत गटासाठी कुठलीही व्यवस्था नाही. लोकसंख्या मोठ्या प्रमानात वाढली. मात्र पोलीस स्टेशनची संख्या तेच आहे विशेष म्हणजे महावितरण विभागाचे तक्रार निवारण केंद्रातही वाढ झाली नाही. पर्यटनाची व्यवस्था नाही अनेक ठिकाणी पर्यटनाला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा नाही.

त्यामुळे दोन्ही आमदारांनी आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यानी काय केले असे अनेक प्रश्न निर्मान झाले आहे. या निवडणुकी मध्ये मी काम केले म्हणून जनतेकडून मत मागत आहे. हि मतदान रुपी लढाई अकार्यक्षमते विरुद्ध कार्यक्षमता अशीच आहे. जनतेसाठी किवा महिलाच्या सुरक्षेसाठी मात्र त्यांना सी.सी.टी.व्ही. ची आवश्यकता वाटत नाही. जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर जवळ पास १० हत्या झाल्या. कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु त्यांचे सत्ताधारणा काही घेणे देणे नाही उलट जनतेच्या दारी जाऊन निर्लज्यासारखे मते मागत आहे असा घनाघात डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी केला आहे.

शेतकऱ्याविषयी उद्धट भाषा बोली जाते, महिलानाही त्यातून सोडल्या जात नाही शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव नाही, तीच परीस्थिती कापसाची सुध्दा आहे. शेतकरी संकटात सापडला असताना त्यांना मदत करण्याऐवजी पिढवनुक केल्या जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड ची खरेदी सुरु नाही दोन्ही बाजार सामित्या काँग्रेस च्या ताब्यात आहे. त्या मुळे बाजार समितीतील पदाधिकारी आपल्या सोयीचे राजकारण करून शेतकऱ्यावर हा एक प्रकारे अन्याय आहे. त्यामुळे यांना जागा दाखवण्यासाठी मला निवडून द्या असे भावनिक आव्हान डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी मतदारांना केला आहे

मतदार संघात भाजप काँग्रेसवाल्यांनी विकास कामे केली नाही ती करण्याची जबाबदारी माझी आहे. तिन्ही तालुक्यात मोठे उद्योग आणून युवक व युवतीना रोजगार मिळवून देणार, बचत गटासाठी चांगले काम करणार आरोग्य, शिक्षण शेतातही सुधारणा करणे गरजेचे आहे. रोड रस्ते करून विकास म्हटले जात नाही असे डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी मतदारांना म्हटले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!