धामणगाव रेल्वे

ईव्हीएम विरोधात घुसळी कामनापुरातील नागरिक एकवटले ; ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरची मागणी

माजी सरपंच जगदीश काटगळे, समीर ढगे सह शेकडो नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धामणगाव रेल्वे –

ईव्हीएम बंद च्या विरोधात धामणगाव रेल्वे तालुक्यातील कामनापुरातील नागरिक एकवटले असून त्यांच्यामते आतापर्यंत ईव्हीएम द्वारे झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये विलक्षण संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु देशातील निवडणूका पारदर्शक होणे अत्यावश्यक आहे. तसेच नागरिकांच्या मताचा आदर राखण्यासाठी लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणूका ईव्हीएम मशीन द्वारे न घेता त्या बॅलेट पेपरवर घ्याव्या अशा विषयाचे निवेदन घुसळी कामनापूर येथील माजी सरपंच सह शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी याना केली आहे.

        दिलेले निवेदन निवडणूक आयोगाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. तरीसुद्धा निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे झाली तर घुसली कामनापुरातील मतदान केंद्रावरवरील दुष्परिणामास यंत्रणा जबाबारदार राहील असा इशारा देखील दिलेल्या निवेदनात देण्यात आला असून निवेदनावर माजी सरपंच जगदीश भा. काटगळे, समीर न. ढगे सह शेकडोच्या वर नागरिकांच्या स्वाक्षरी आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!