राजकीय

प्रताप अडसड यांना छत्रपती शासन संघटनेचा जाहीर पाठिंबा…

छत्रपती शासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रताप अडसड यांना निवडून आणण्याचा केला निर्धार….

धामणगाव रेल्वे –

धामणगाव मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार प्रताप अडसड यांना छत्रपती शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश गाठे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित जाहीर पाठिंबा देण्यात आला.

      तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणूकीमध्ये एकमताने आपल्याला सहकार्य करतील अशी ग्वाही यावेळी छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश चंद्रकांत गाठे व धामणगांव रेल्वे तालुका अध्यक्ष रोहन भोयर तसेच चांदुर रेल्वे तालुका अध्यक्ष केतन कळंबे नांदगाव खंडेश्वर तालुका अक्षय मोरे व अनेक कार्यकर्त्यांनी दिली आहे…

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!