यवतमाळ

शेतकऱ्याच्या शेतातील धान्य चोरीचे दोन्ही गुन्हे उघड ; बाभुळगाव पोलिसांची कामगिरी

४ आरोपीना अटक करून १० लक्ष २२ हजार ५०० चा मुद्देमाल जप्त

बाभुळगाव प्रतिनिधी

बाभुळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा कृष्णापुर येथील शेतकरी प्रदीप मेंढे, व बाभूळगाव येथील शेतकरी प्रशांत ताथेड यांचे शेतातील धान्य गोडावून मधून कापुस, तुर, सोयाबीन, चना असा शेतमाल रात्री दरम्यान चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली होती. शेतकरी यांच्या तक्रारीवरून पो. स्टे बाभुळगाव येथे अज्ञाता विरुद्ध कलम ४६१, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला होता. बाभुळगाव पोलिसांनी सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत तातडीने तपासाची चक्रे फिरवीत धान्य चोरीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणून त्यातील ४ आरोपी यांना अटक करून त्यांच्याजवळून १० लक्ष २२ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आशिष धरम मुन वय २६ वर्ष, सागर गोपाल ठाकरे वय २३ वर्ष, रोशन राजेंद्र कामडे वय २४ वर्ष, आकाश विलास भानसे वय २८ वर्ष सर्व रा. कृष्णपुर ता.बाभूळगाव जि. यवतमाळ असे अटकेतील आरोपीचे नावे..

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 

तपासादरम्यान सर्व अटक आरोपींचां पोलीस कोठडी रिमांड घेऊन आरोपींनी इतरत्र आणखी कुठे शेतमाल चोरीचे गुन्हे केले काय याचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. तर सदर आरोपीकडून ५ क्विंटल कापूस ३५ हजार रू, ६ क्विंटल सोयाबीन – ३० हजार रू, ५ क्विंटल चना २७ हजार ५०० रू, ३ क्विंटल तूर – ३० हजार रु, तसेच चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने टाटा एस एमएच३४ एबी ०७५६ किंमत ५ लक्ष रू, ऑटो एमएच ३१ डीव्ही ८२२७ किंमत १ लक्ष ५० हजार रू, मोपेड एसेंस एमएच २९ बीडब्लू ८८९७ किंमत १ लक्ष रू, पॅशन प्रो एमएच २९ सीडी ०९८४ किंमत ९५ हजार रू, व चारही आरोपीकडे ४ अँड्रॉइड मोबाईल किंमत ५५हजार रू असा एकुन १० लक्ष २२ हजार ५०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ दिनेश बैसाणे, ठाणेदार सुनील हुड यांचे मार्गदर्शनात गुन्ह्याचे तपास अधिकारी एपीआय सुरज तेलगोटे, पीएसआय डी. एम. वाघमारे, एनपीसी मंगेश कळसकर, योगेश बनकर, एच.सी संजय कोहाड, पीसी अमोल खडसे, सैनिक योगेश सरडे, विक्रम गावंडे, चव्हाण, लोणारे, यांनी केली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!