धामणगाव रेल्वे

शिव जन्मोत्सवानिमित्त शेंदुर्जना खुर्द येथे रक्तदान शिबीर

प्रतिनिधी – धीरज भैसारे

१९ फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती निमित्त शेंदुर्जना खुर्द येथे प्रहार जनशक्ती पक्ष व समस्त गावकरी मंडळच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम शिवाजी महाराज राजमाता जिजाबाई संत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिर सुरू करण्यात आले तर यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरांसाठी बालाजी ब्लड बँक अमरावती येथील टीम बोलण्यात आली होती त्यामध्ये डॉ. रामटेके डॉक्टर संजय दिघे, नंदू कसे इत्यादींनी आपले कार्य यशस्वीरित्या पार पाडले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवीण हेंडवे सौरभ इंगळे, सुरज गंथडे, निलेश जयसिंगपूरे, अमर गायधने, अंकुश पाटील, मंगेश शेंडे, शुभम खत्री, प्रफुल जांबट, राजु रेवस्कर विकास रोहीकर अविनाश मैंद अक्षय मेश्राम अनिकेत वानखडे व प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व सदस्यांनी व गावकरी मंडळींनी अथक परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!